मोहोळचे आमदार रमेश कदम यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

July 5, 2015 4:37 PM0 commentsViews:

dasraeresafdsvfy

05 जुलै : राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार रमेश कदम यांना 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मोहोळ कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी आमदार कदम यांच्यासह 57 आंदोलकांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. कदम यांच्या विरोधात शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, सरकारी कर्मचार्‍यांना दुखापत पोहचवणे, शासकीय कामात व्यत्यय आणणे, अशी कलमांर्तगत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आठ दिवसांपूर्वी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी आमदार रमेश कदम यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संतप्त समर्थकांनी पोलिसांवरच दगडफेक केली. या दगडफेकीत 15 ते 20 पोलीस जखमी झाले आहे. त्यानंतर आज रमेश कदम आणि 57 आंदोलकांना मोहोळ कोर्टात हजर करण्यात आले होते. मोहोळ कोर्टाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close