पत्रकार अक्षय सिंह यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार

July 5, 2015 5:04 PM0 commentsViews:

akshaadasdrasy1

05 जुलै : व्यायसायिक शिक्षण मंडळाच्या भरतीत गौरव्यवहार झाल्याच्या व्यापम घोटाळ्याचं कव्हरेज करणार्‍या आज तक या वृत्तवाहीनीचा पत्रकार अक्षय सिंह याचा संशयास्पद मृत्यु झाला आहे. अक्षयच्या पार्थिवावर दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अक्षयला अंत्यसंस्काराला राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल उपस्थित होते.

अक्षय काही दिवसांपासून मध्यप्रदेशमध्ये व्यापम घोटाळ्याच्या तपासाचं कव्हरेज करण्यासाठी आला होता. पिडीतांच्या पालकांची मुलाखत झाल्यानंतर अक्षयच्या तोंडातून अचानक फेस यायला लागला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यानंतर प्रकृती चिंतानजनक असल्यानं खाजगी हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं. मात्र शेवटी अक्षयला गुजरातच्या दाहोदच्या रुग्णालयात पाठवलं, मात्र तिथ त्याला मृत घोषीत करण्यात आलं.

दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी अक्षयच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी एसआयटी नेमण्यासाठी हायकोर्टाला पत्र लिहिणार असल्याचं सांगितलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close