कानपूर टेस्ट : भारताच्या पहिल्या इनिंग मध्ये 642 रन्स

November 25, 2009 1:38 PM0 commentsViews: 3

25 नोव्हेंबर भारत- श्रीलंका दरम्यानच्या टेस्ट सीरिजमध्ये भारतीय टीम पहिल्या इनिंगमध्ये 642 रन्सवर ऑलआऊट झाली. राहुल द्रविडने शानदार 144 रन्स केले. तर सचिन तेंडुलकर 40 रन्सवर पॅव्हेलिअनमध्ये परतला. व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि युवराज सिंगनंही आपापल्या हाफसेंच्युरी पूर्ण केल्या. हे दोघे आऊट झाल्यानंतर हेराथनं भारताचं शेपूट झटपट गुंडाळलं. त्याने 121 रन्स देत 5 विकेट्स घेतल्या. तर मेंडिस आणि मुरलीधरननं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. कानपूर टेस्टमध्ये दुसर्‍या दिवसअखेर श्रीलंकेनं एक विकेट गमावत 66 रन्स केलेत. भारताच्या बलाढ्य स्कोअरला उत्तर देताना श्रीलंकेची डळमळीत सुरुवात झाली. झहीर खानने पहिल्याच बॉलवर तिलकरत्ने दिलशानला भोपळाही फोडू न देता पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पर्णविरतरणा आणि संगकाराने सावध खेळत इनिंग सावरली. दिवसअखेर दोघेही प्रत्येकी 30 रन्सवर नॉटआऊट आहेत.

close