26/11 च्या मुद्यावरुन लोकसभेत लाजिरवाणा गदारोळ

November 26, 2009 8:36 AM0 commentsViews:

26 नोव्हेंबर 26/11 च्या शहिदांना श्रद्धांजली वाहत गुरुवारी संसदेचं कामकाज सुरु झालं खरं, पण काहीवेळातच सरकार आणि विरोधकांमधली एकी फुटली आणि दोघांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु केले. 26/11 नंतर तपासात सुसूत्रता नव्हती, असा आरोप विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणींनी केला. त्याचबरोबर पीडितांना अजूनही मदत मिळाली नसल्याचं सांगितलं. यावर अर्थमंत्री प्रणव मुखर्जी चिडले आणि त्यांनी विरोधकांवर दहशतवादाचं राजकारण करत असल्याचा आरोप केला. या लाजिरवाण्या गदारोळातच कामकाज स्थगित करण्यता आलं.

close