शिक्षकाने विद्यार्थ्यांना नापास करण्याची धमकी देऊन करून घेतलं सर्व्हेक्षण

July 6, 2015 5:37 PM0 commentsViews:

pune school4306 जुलै : शाळाबाह्य मुलांचं सर्व्हेक्षण वादात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अति महत्वाच्या मानल्या जाणार्‍या सर्व्हेक्षणासाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांनी त्यांना दिलेल्या जबादारीकडे दुर्लक्ष करत शाळकरी विद्यार्थ्यांकडून शाळा बाह्य मुलांची मोजणी केल्याची धक्कादायक बाब पुण्यात उघडकीला आलीय. या शिक्षकाने विद्यार्थांना नापास करण्याची धमकी देऊन सर्व्हेक्षण करून घेतलंय.

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातील कळस गावात असलेल्या एका खाजगी शाळेतील शिक्षकांनी हा हलगर्जीपणा केला. आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांना नापास करण्याची धमकी देत सर्व्हे करायला भाग पाडलं.

तब्बल 5 तास गल्लो गल्ली फिरून सर्व्हे करणार्‍या या विद्यार्थ्यांना केवळ वडापाव खायला देण्यात आला. ही विद्यार्थ्यांची पिळवणूक असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय. आणि संबंधित शिक्षकांना बडतर्फ करण्याची मागणी केलीय. तर या प्रकाराची चौकशी केली जाईल, असं उत्तर शाळा प्रशासनाकडून दिलं जातंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close