26/11च्या वक्तव्यामुळे नारायण राणे अडचणीत

November 26, 2009 11:05 AM0 commentsViews: 1

26 नोव्हेंबर 26/11 हल्लाप्रकरणी नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. 26/11 च्या हल्ल्यात राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला होता. याबाबत हायकोर्टात गुरुवारी सुनावणी झाली. कोर्टानं वोरा कमिटीच्या अहवालात राजकीय नेत्यांचा उल्लेख नाही, असं निदर्शनास आणून दिलं आहे. त्यावर राज्य सरकारनं हा अहवाल केंद्र सरकारचा असल्याचं कोर्टात सांगितलं. कोर्टानं याबाबत केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. नारायण राणे यांनी कोर्टाला दिलेल्या उत्तरात आपण वोरा कमिटीच्या अहवालाच्या आधारेच वक्तव्य केलं होतं असा खुलासा केला होता.

close