काझमी यांना खटल्यातून काढून टाकण्याचा कोर्टाचा विचार

November 26, 2009 12:32 PM0 commentsViews:

26 नोव्हेंबर कसाबचे वकील अब्बास काझमी वारंवार खोटं बोलत असल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळे त्यांना या खटल्यातून काढण्याचा कोर्टाचा विचार सुरू आहे. कोर्टानं याप्रकरणी काझमी यांना माफी मागायला सांगितली आहे. याआधीही अब्बास काझमी यांनी कसाबला हिंदी समजत नाही म्हणून कोर्टाची सर्व कागदपत्र उर्दूतून देण्याची मागणी केली होती. तेव्हाही त्यांच्यावर हा खटला लांबवण्यासाठी ही मागणी करत असल्याचा आरोप सरकारी पक्षाने केला होता. खटल्याच्या सुरुवातीपासूनच अब्बास काझमी यांचे अनेक मुद्यांवरून वाद सुरु आहेत.

close