श्रीलंका पराभवाच्या छायेत

November 26, 2009 1:16 PM0 commentsViews: 3

26 नोव्हेंबर कानपूर टेस्टच्या तिसर्‍या दिवशी श्रीलंकेची बॅटींग ऑर्डर सपशेल फ्लॉप ठरली. श्रीलंकेवर फॉलो ऑनची नामुष्की ओढावली. फॉलो ऑन नंतरही श्रीलंकेची सुरूवात खराब झाली. दिवस अखेर श्रीलंकेने 4 विकेट गमावत 57 रन्स केलेत. श्रीलंकेचे संघ अजुनही 356 रन्सने पिछाडीवर आहे. कम बॅक करणारा भारताचा फास्ट बॉलर श्रीशांतनं पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट घेतल्या. तर फॉलो ऑननंतर खेळायला आलेल्या श्रीलंकेला पहिला धक्काही श्रीशांतनेच दिला. पहिल्या इनिंगमध्ये हरभजन सिंगला दोन विकेट मिळाल्या तर कसोटीत पदार्पण करणार्‍या प्रग्यान ओझानंही दोन विकेट पटकावल्यात. झहीर खानने एक विकेट काढली. श्रीलंकेतर्फे पहिल्या इनिंगमध्ये महेला जयवर्धने सर्वाधिक 47 रन्स केले.

close