7/11च्या बॉम्बस्फोटात गंभीर जखमी झालेल्या पराग सावंत यांचा मृत्यू

July 7, 2015 11:58 AM0 commentsViews:

PARAg

07 जुलै : 2006 साली मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात गंभीर जखमी झालेल्या पराग सावंत यांचा आज (मंगळवारी) मृत्यू झाला आहे. गेल्या 9 वर्षांपासून पराग कोमात होते. मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात परागने अखेरचा श्वास घेतला.

11 जुलै 2006ला मुंबईच्या लोकलमध्ये साखळी स्फोट झाले होते. त्यामध्ये पराग यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. या स्फोटानंतर त्याच्यावर उपचार सुरू असताना ते कोमात गेले. गेली 8 वर्षे ते त्याच अवस्थेत होते. या 9 वर्षांत त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या. मुंबईतलं हिदुजा रुग्णालय हेच त्याच्या कुटुंबीयांचं इतके वर्षं घर झालं होतं.

सुदैवानं, त्यांच्या पत्नी प्रीती सावंत यांना रेल्वेत नोकरी मिळाली, आणि त्यामुळे घर चालवण्यात त्यांना मोठी मदत झाली. पराग यांना आठ वर्षांची एक मुलगी आहे. बॉम्बस्फोटावेळी परागची पत्नी सात महिन्यांची गर्भवती होती. पण दैवाचा क्रूर खेळ असा की परागला कधीच त्याच्या मुलीला पाहाता आलं नाही. दुसरीकडे, या स्फोटातल्या दोषींना मात्र अजूनही शिक्षा झालेली नाही. हा खटला अजून सेशन्स कोर्टातही सुनावणीसाठी आलेला नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close