शाहिद-मीरा आज विवाहबंधनात अडकणार

July 7, 2015 9:46 AM0 commentsViews:

shahid weds miray

07 जुलै : आपल्या दमदार डान्स आणि अभिनयाच्या जोरावर लाखोंच्या मनावर राज्य करणारा चॉकलेट बॉय शाहिद कपूर आज बोहल्यावर चढणार आहे.

गुरगावमध्ये आज शाहिद कपूर मीरा राजपूत हिच्याशी विवाहबद्ध होणार आहे. या विवाह सोहळ्याला 500 पाहुणे हजेरी लावणार आहेत. यात शाहिद-मीराचे कुटुंबिय आणि मोजक्या मित्रमंडळीच असणार आहेत.

दिल्लीत काल रात्री शाहिदच्या लग्नाचा संगीताचा कार्यक्रम पार पडला. शाहिदच्या लग्नाचा ड्रेस कुणाल रावल याने, तर मीराचा ड्रेस हा अनामिका खन्नाने डिझाईन केला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close