गुंड सुनील राऊतला 9 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

November 27, 2009 8:29 AM0 commentsViews: 1

27 नोव्हेंबर IBN लोकमतवरील हल्ल्याचा सूत्रधार गुंड सुनील राऊतला विक्रोळी कोर्टाने 9 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी विक्रोळी कोर्टासमोर त्याला हजर करण्यात आलं. त्यावेळी कोर्टानं हा निर्णय सुनावला. सुनील राऊत 24 तारखेला पोलिसांना शरण आला होता. त्यानंतर 25 तारखेला त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी कोर्टानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ती मुदत शुक्रवारी संपत होती. तर 25 तारखेलाच इतर 13 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सुनील राऊतवर इंडियन पिनल कोडनुसार 143, 147, 149 आणि 307 खाली गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

close