आयबीएन-लोकमतवरील हल्ल्याचा प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया कडून निषेध

November 27, 2009 8:47 AM0 commentsViews: 6

27 नोव्हेंबर शिवसेनेच्या गुंडांनी 'आयबीएन-लोकमत' आणि संपादक निखिल वागळे यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा प्रेस कौन्सिल ऑफ इंडियानं निषेध केला आहे. या हल्ल्याबाबत प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती जी. एन. रे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. त्यात हल्लेखोरांवर कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे. मीडिया आणि पत्रकारांचं स्वातंत्र्य तसंच हक्कांची जपणूक करण्यासाठी संसदेने प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना केली आहे. मीडियाच्या स्वातंत्र्याचं रक्षण करा, अशा सूचनाही प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने या हल्ल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दिल्या आहे. मुख्यमंत्र्यांनी माध्यमांच्या संरक्षणासाठी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी माजी न्यायमूर्ती जी. एन. रे यांनी केली आहे.

close