प्रवीण महाजनला 14 दिवसांचा पॅरोल मंजूर

November 27, 2009 8:51 AM0 commentsViews: 3

27 नोव्हेंबर प्रमोद महाजन यांच्या हत्या प्रकरणातला दोषी प्रवीण महाजन याला नाशिक सेंट्रल जेलने 14 दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे. दोषी म्हणून 22 महिने तुरुंगवास भोगल्यानंतर 14 दिवसांच्या पॅरोलला मंजूरी देता येते. तसंच प्रवीणने वैयक्तिक कामांसाठी पॅरोल मागितला होता. प्रवीणला मुंबईत घेऊन जाण्यासाठी त्याची पत्नी सारंगी महाजन आणि इतर नातेवाईकही नाशिक जेलमध्ये आले होते.

close