महापौरपद वाचवण्यासाठी शिवसेनाप्रमुख मार्गदर्शन करणार

November 27, 2009 8:54 AM0 commentsViews:

27 नोव्हेंबर मुंबई महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना भवनात बैठक घेणार आहेत. महापौर निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आहे. त्यात दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनाप्रमुख स्वत:च शिवसेना भवनात येऊन नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत शिवसेनाप्रमुख शिवसेनेचा विधान परिषदेचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेसाठी माजी विरोधी पक्ष नेते रामदास कदम यांच्याच नावाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवलेले आदेश बांदेकर यांच्याही नावाची चर्चा आहे.

close