आम्ही वारकरी !, पाठवा वारीतले सहभागाचे फोटो

July 7, 2015 6:20 PM0 commentsViews:

bheti lagi jiva ibn lokmat307 जुलै : भेटी लागी जीवा लागलीस आस… ज्ञानोबा माऊली तुकाराम, बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम या जयघोषानं आता पंढरपूरच्या पालखी मार्गावरचा आसमंत दुमदुमून निघणार आहे. लाखोंच्या संख्येनं वारकरी या पारंपरिक आषाढी वारी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले आहेत.

एकदा तरी वारीत सहभागी व्हावं असं स्वप्न प्रत्येक वारकरी उराशी बाळगून असतो. आता वारीला सुरुवात झालीय आणि वारकर्‍यांना वेध लागले आहेत ते विठुरायाच्या नगरीचे. तुम्हीही या वारीमध्ये वारकरी होऊ शकता आमच्या फेसबुक वारीमध्ये. तुम्हाला एवढंच करायचंय… तुमच्या शहरातून, गावातून निघालेल्या वारीचे फोटो, व्हिडिओ किंवा तुम्ही सहभाग घेतलेल्या वारीतले सेल्फी फोटो आम्हाला पाठवा. आम्ही ते प्रसिद्ध करू आमच्या वेबसाईटवर आणि https://www.facebook.com/bhetilagijiva2015 या आमच्या फेसबुक पेजवर. चला, तर मग साजरी करूया फेसबुक वारी…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close