पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इव्हेंट मॅनेजर -चव्हाण

July 7, 2015 6:39 PM0 commentsViews:

pruthvirajchavan_modi07 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इव्हेंट मॅनेजर म्हणून काम करतायेत. आतापर्यंत त्यांनी 54 मोठे इव्हेंटस त्यांनी केले आहेत अशी खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीये.

तसंच शेतकरी संघटनेनंही ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा विश्वासघात केल्याचा आरोपही चव्हाण यांनी यांनी केलाय. शेतकर्‍यांची परिस्थिती सुधारण्यासाठी 15 हजार कोटींचं कर्जमाफी पॅकेज राज्य सरकारनं जाहीर करावं अशी मागणी चव्हाण यांनी केलीये. शेतकर्‍यांचा मागण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू करणार असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close