मुंबईत ‘लेप्टो’चे एका आठवड्यात 12 बळी

July 7, 2015 7:14 PM0 commentsViews:

lepto_mumbai07 जुलै : मुंबईत पाऊस पडला की भिती वाटू लागते ती पावसामुळे होणार्‍या आजारांची…मग तो डेंग्यू असो की मलेरीया..पण या वर्षी मात्र काळजी घ्यावी ती लेप्टोस्पायरोसीस होऊ नये म्हणून असा सल्ला मुंबई महापालिकेनं दिलाय. कारण, जुलैच्या पहिल्याच आठवड्यात लेप्टोनं मृत्यू झालेल्यांची संख्या 12 वर पोहचली आहे.

त्यापैकी 11 जण हे गोरेगाव ते दहिसर या भागातले आहेत, तर एक जण वरळी परिसरातला आहे. एका आठवड्यात 12 जणांच्या मृत्युमुळे पालिकेपुढे ही कोडं निर्माण झालंय. त्यामुळं लोकांनी पाऊस पडल्यानंतर तुंबलेल्या पाण्यात जाणं टाळावं असा सल्ला पालिकेनं दिलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close