अब्बास काझमींनी कोर्टात मागितली माफी

November 27, 2009 12:25 PM0 commentsViews:

27 नोव्हेंबर खोटं बोलल्याबद्दल अजमल कसाबचे वकील अब्बास काझमी यांनी शुक्रवारी कोर्टाची माफी मागितली. काझमी वारंवार खोटं बोलत असल्याबद्दल गुरुवारी कोर्टाने काझमींना फटकारलं होतं. त्यांना या खटल्यातून काढून टाकण्याबद्दल विचारणाही कोर्टाने सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे केली होती. त्यावर काझमींनी कोर्टाची माफी मागावी, असं निकम यांनी सुचवलं होतं. खटल्याच्या सुरुवातीपासूनच अब्बास काझमी यांचे अनेक मुद्यांवरून वाद सुरु आहेत.

close