गरज भासल्यास गणेशोत्सवासाठी कायद्यात बदल करू – मुख्यमंत्री

July 8, 2015 9:15 AM0 commentsViews:

345508-devendra-fadnavis-farmer

08 जुलै : गणेशोत्सवांना ऐतिहासिक परंपरा असून ते साजरे झालेच पाहिजे आवश्यकता असल्यास कायद्यात बदल करू. अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गणेश मंडळांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत न्यायालयाने काही निर्बंध घातले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या सांस्कृतिक जनाधिकार समितीसोबत चर्चा केली.मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या पुढाकाराने महत्त्वाची भेट झाली.

गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला पाहिजे. पण नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल, त्यासाठी वाहतूक नियोजन केले जाईल. तसंच आपत्कालीन आराखडा तयार केला जाईल. याबाबत राज्य सरकार मंडळांच्या पाठीशी राहणार असून, मंडळांचे हे मुद्दे शासन न्यायालयात मांडेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी दिली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close