तलवार विक्रीच्या खटल्यात समीर कुलकर्णी निर्दोष

November 27, 2009 12:42 PM0 commentsViews:

27 नोव्हेंबर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातला संशयित आरोपी समीर कुलकर्णीला एका खटल्यात जळगाव कोर्टानं निर्दोष सोडलं आहे. वीस वर्षांपूर्वी अवैधरित्या तलवारी आणून विकल्याचा त्याच्यावर आरोप होता. जळगाव पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार असणारा समीर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात सापडला होता. त्यानंतर जळगावमधल्या या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली होती. या खटल्यातील साक्षीदार फितूर झाल्याचा समीरला फायदा झाल्याच सरकारी वकिलांचं म्हणणं आहे. तर, पोलिसांनी समीरवर दाखल केलेला गुन्हा पूर्णपणे खोटा असल्यानेच समीरला कोर्टानं निर्दोष सोडल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे.

close