संगमनेरमध्ये सातवीतील 11 विद्यार्थ्‍यांनी केला वर्गमित्राचा खून

July 8, 2015 10:16 AM0 commentsViews:

sangamner tyming

08 जुलै : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून वर्गमित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी 11 विद्यार्थ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संगमनेरमधल्या राजापूर गावात ही घटना घडली होती.

किरण सोनावणे असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या आईने संगमनेर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. किरण हा राजापूरच्या नुतन माध्यमिक विद्यालयात इयत्ता सातवीत शिकत होता. 30 जून रोजी वर्गातील काही मित्रांसोबत किरकोळ कारणावरून त्याचा वाद झाला. त्यात 11 विद्यार्थ्‍यांनी मिळून किरणला बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्‍यान त्‍याचा मृत्‍यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close