IBN लोकमत इम्पॅक्ट : अपघातात अपंगत्व आलेल्या देवराम ढोरेंना मिळाला मदतीचा हात

July 8, 2015 1:24 PM0 commentsViews:

08 जुलै : मुंबई पोलिसांत काम करणारे देवराव ढोरे यांची व्यथा आयबीएन लोकमतने मांडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेनं ढोरे कुटुंबियांना मदतीचा हात दिला आहे. हिंदुजा हॉस्पिटमधील डॉक्टर्सच्या पथकानं काल (मंगळवारी) देवराम ढोरे यांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी केली. ढोरे यांना लागणार्‍या सोयींबरोबरच त्यांच्या उपचारासाठी एका डॉक्टरची नेमणूकही करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी देवराम ढोरे यांच्या सर्व उपचाराचा खर्च उचलला आहे.

सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकरही ढोरे कुटुंबीयाच्या मदतीला धावून आले आहेत. ढोरे कुटुंबीयांना दर महिन्याला 10 हजार रुपये ‘मिक्टा’कडून देण्यात येतील, असं मांजरेकरांनी जाहीर केलं आहे. त्याच बरोबर चित्रपटसेनेचे उपाध्यक्ष मातेकर यांनी 10 हजार रुपयांचा धनादेश ढोरे यांच्याकडे सोपवला आहे.

मुंबई पोलीस दलात काम करणारे देवराव ढोरे मुंबई पोलीस दलातील 22 वर्षांच्या सेवेनंतरही त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. 28 मार्च 2012 रोजी कामावरुन परतत असताना काँन्स्टेबल ढोरे एका रेल्वे अपघातात गंभीर जखमी झाले. या अपघातामध्ये डोक्याला जबर मार लागल्यानं देवराम ढोरे यांची सध्याची अवस्था मरणापेक्षाही वाईट झाली होती. ढोरेंची दृष्टीही गेली आहे.

त्यामुळं त्यांना कामावर गैरहजर राहण्याचा दाखला देत मुंबई पोलिसांनी त्यांना रुग्णता सेवानिवृत्त केलं. मात्र, पोलीस प्रशासनाच्या या आडमुठ्‌या धोरणामुळे ढोरे यांना मिळणारा पगार जानेवारी महिन्यापासून बंद करण्यात आला. याबरोबर निवृत्तीनंतर मिळणारी ग्रॅज्युएटीमधूनच पोलीस दलाचं झालेलं नुकसानही भरुन काढण्यात येणार आहे. प्रशासनाच्या असंवेदनशीलपणामुळे ढोरे कुटुंबावर उपासमारीची वेळ होती. आयबीएन लोकमतने या बहादूर पोलिसाची व्यथा जगसमोर आली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close