मुंबईच्या महापौरपदासाठी काँग्रेस-शिवसेनेकडून अर्ज दाखल

November 27, 2009 12:45 PM0 commentsViews: 3

27 नोव्हेंबर मुंबई महानगरपालिकाच्या महापौरपद निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे प्रेसीला कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासोबत राजहंस सिंग, वर्षा गायकवाड आणि कालिदास कोळंबकर हे काँग्रेसचे नेते हजर होते. अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारचा शेवटचा दिवस आहे. दुसरीकडे शिवेसनेकडून श्रद्धा जाधव यांचं नाव या निवडणुकीसाठी निश्चित करण्यात आलं आहे. महापौरपदाची निवडणूक 1 डिसेंबरला होणार आहे. काँग्रेसने यावेळी महापौरपदाच्या निवडीसाठी गुप्त मतदानाची मागणी केली आहे, तर शिवसेनेनं हात वर करून मतदान घेण्याची मागणी केली आहे. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीकडून विद्या चव्हाण, तर भाजपकडून शैलजा गिरकर यांनी आपले अर्ज दाखल केले. सत्ताधारी आणि विरोधकांच्या नगरसेवकांमध्ये फक्त पाच नगरसेवकांचा फरक आहे. गुप्त मतदान घेतल्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. याबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.

close