भाजपच्या डॅमेज कंट्रोलसाठी अमित शहा महाराष्ट्र दौर्‍यावर ?

July 8, 2015 3:54 PM0 commentsViews:

amit shah on vidarbha08 जुलै : पंकजा मुंडेंचा चिक्की घोटाळा, विनोद तावडेंची बोगस डिग्री प्रकरणामुळे वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या फडणवीस सरकारच्या डॅमेज कंट्रोलसाठी आता भाजपचे अध्यक्ष अमित शाह धावून आले आहे. अमित शहा यांचा आजपासून महाराष्ट्र दौरा सुरू होतोय. भाजपने सुरू केलेल्या ‘महा संपर्क अभियान’ या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी ते महाराष्ट्रात येणार आहेत. शहा यांच्या दौर्‍याची सुरुवात मुंबईपासून होणार आहे.

भाजपने या अभियानासाठी 10 कोटी सदस्यांची निवड झाली आहे. त्यापैकी 1 कोटी सदस्यांची निवड ही एकट्या महाराष्ट्रातूनच झाली असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुंगंटीवार यांनी दिलीये. आज संध्याकाळी अमित शहा मुंबईत दाखल होतील. त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याच्या आमदार, खासदारांची भेट घेतील. सध्या सुरू असलेल्या आरोपांमुळे पक्षामध्ये तणावाचं वातावरण झालंय. ते शांत करण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close