….तर ‘त्या’ चिमुरुडीचा जीव वाचला असता -हेमा मालिनी

July 8, 2015 4:47 PM0 commentsViews:

hema_malini accident08 जुलै : त्या मुलीच्या वडिलांनी नियम पाळले असते तर हा अपघात टळला असता, आणि तिचा जीव वाचला असता. त्या मुलीला उगाच आपला जीव गमवावा लागला असा खुलासा अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी केलाय. अपघातानंतर पहिल्यांदाच हेमा मालिनी यांनी यावर ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली.

गेल्या आठवड्यात 2 जुलै रोजी हेमा मालिनी यांच्या मर्सिडीजला राजस्थानच्या दौसा इथं अपघात झाला होता. रात्री आठच्या सुमारास मर्सिडीज आणि एका ऑल्टो कारची समोरासमोर धडक झाली होती. या भीषण अपघातात एका चिमुरडीचा मृत्यू झाला होता. तर 4 जण जखमी झाले होते. तसंच हेमा मालिनी यांनाही दुखापत झाली होती. आठवड्याभराच्या उपचारानंतर हेमा मालिनींनी या प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं. ज्या दिवशी अपघात घडला त्यादिवशी त्या मुलीच्या वडिलांनी नियम पाळले असते तर हा अपघात टळला असता, आणि तिचा जीव वाचला असता. त्या मुलीला उगाच आपला जीव गमवावा लागला असा दावाचा मालिनी यांनी केला. तसंच मला त्या परिवारासाठी खूप वाईट वाटतंय असंही त्या म्हणाल्यात. एकाप्रकारे यात आपल्या ड्रायव्हरची चूक नव्हती, असं अपिरत्यक्षरित्या सुचवण्याचा प्रयत्न मालिनींनी केलाय. एवढंच नाहीतर हेमा मालिनींनी अपघाताबाबत मीडियावरही नाराजी व्यक्त केली. दरम्यान, दौसा पोलिसांनी हेमा मालिनींचा दावा खोडून काढला. अपघाताच्यावेळी हेमा मालिनींचा ड्रायव्हर गाडी जास्त जोरात चालवत होता. गाडीचा स्पीड अंदाजे 150 किमी प्रतितास होता. ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळेच अपघात झाला होता असा खुलासा पोलिसांनी केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close