मुख्यमंत्र्यांचा सहकुटुंब ‘तो’ फोटो जुना ; नागपुरात गुन्हा दाखल

July 8, 2015 6:35 PM0 commentsViews:

cm usa fake photo 08 जुलै : सोशल मीडियावर कधी काय शेअर होईल याचा नेम नाही. आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या कुटुंबासह अमेरिकेत सुट्टीचा आनंद लुटत आहे पण महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत आहे अशा आशयासह व्हॉट्सऍप आणि फेसबुकवर फोटो शेअर केला जात आहे. पण, मुळात हा फोटोच जुना आहे. व्हाट्सअप विरांच्या या प्रतापामुळे नागपुरच्या नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यातील शेतकरी आत्महत्या करत असतांना मुख्यमंत्री परिवारासोबत अमेरिकेत सुट्टया घालवत आहे असा मजकुर सोशल मीडिया साईट्स ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्सऍपवर टाकण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरही हा फोटो टॅग करण्यात आलाय.

या पोस्ट टाकणार्‍यांची चौकशी करून सायबर लॉ अंतर्गत या प्रकरणातील दोषीवर कारवाई होणार आहे. या प्रकरणी भाजपचे नेते धर्मपाल मेश्राम यांनी नागपुरच्या नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय.

विशेष म्हणजे, या अगोदरही मुख्यमंत्री विमानात प्रवास करत असतानाचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावेळीही हा फोटो जुना असल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांना करावा लागला होता. आता तर मुख्यमंत्र्यांच्या खासगी आयुष्यातच व्हॉट्सअपविरांनी हस्तक्षेप करण्याचा कहर केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close