उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

July 8, 2015 7:22 PM0 commentsViews:

Uddhav and fadnavis1108 जुलै : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत.मुंबईतील वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही भेट सुरू आहे.

गणेशोत्सव साजरा करण्यात येणार्‍या कायदेशीर अडचणींवर तोडगा काढण्यासाठी यामध्ये चर्चा होतेय. हायकोर्टाने मुंबईच्या रस्त्यांवर उत्सव साजरे करायला मनाई केल्यामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे यासाठी कायद्यांमध्ये बदल करण्यात येईल असं खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितलंय. त्या पार्श्वभूमीवर आज ही चर्चा होतेय.

दरम्यान, उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. मात्र, आजच ‘सामना’तून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करण्यात आला. मुख्यमंत्री, मंत्री विदर्भाचे असूनही विदर्भात आनंदाचे क्षण येऊ शकत नाहीत, शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरूच आहेत, अशी टीका सामनातून करण्यात आलीये.

15 जूनपर्यंत शेतकर्‍यांच्या नुकसानीचा पंचनामा वगैरे होऊन त्यांच्या आधीच्या कर्जाचे पुनर्गठन होऊन त्यांना कर्ज मिळेल, असा मुख्यमंत्र्यांचा शब्द होता, पण मदत नाही, कर्ज नाही आणि चूलही पेटत नाही. अशा कोंडीत सापडलेल्या हजारभर शेतकर्‍यांनी वर्षभरात आत्महत्या केल्या असतील तर संपूर्ण विदर्भाचा ‘भंडारा-गोंदिया’ व्हायला वेळ लागणार नाही. विदर्भातील खदखद भंडारा तसंच गोंदिया जिल्हा परिषदेच्या निकालातून बाहेर पडली हे सत्य स्वीकारले तर येणारा काळ कठीण आहे असे भाकीत आम्ही आजच करीत आहोत असंही या लेखात म्हटलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close