मुंबईवर ड्रोनने हल्ला होण्याची शक्यता, पोलीस मुख्यालय रडारवर

July 8, 2015 8:43 PM0 commentsViews:

drone attack alert08 जुलै : मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचं सावट ओढावलंय. सुरक्षा यंत्रणेनं मुंबई पोलिसांना अलर्ट जारी केलाय. 4 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान या दोन महिन्यांच्या काळात ड्रोनच्या सहाय्यानं दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीस मुख्यालयासह वर्दळीची ठिकाणं अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे.

मुंबई पोलिसांनी पोलीस मुख्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरांना सतर्कतेचा इशारा दिलाय. अतिरेकी ड्रोनच्या सहाय्याने नियंत्रित होणारी एअर मिसाईल किंवा हलक्या विमानांच्या सहाय्यानं हा हल्ला करण्याची शक्यता आहे. अलर्ट मिळाल्यानंतर मुंबई पोलीस मुख्यालयासोबत पूर्ण शहराची सुरक्षा वाढवण्यात आल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलंय.

दरम्यान, मुंबईमध्ये सर्व प्रकारच्या ड्रोन उडवण्यावर मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे. रिमोट कंट्रोलने नियंत्रित केले जाणारे ड्रोन उडवण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात सीआरपी कलम 144 नुसार आदेश बजावण्यात आले आहेत. दहशतवादी मुंबईत पॅराग्लाईडर आणि ड्रोनचा वापर करुन हल्ला करू शकतात अशी भीती असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close