बकरी ईद राज्यभर साजरी

November 28, 2009 9:23 AM0 commentsViews: 92

28 नोव्हेंबर त्याग, बलिदानचं प्रतिक असणारी मुस्लिम बांधवांची बकरी ईद म्हणजेचं ईद-उल-जोहा सर्वत्र साजरी होत आहे. हजरत इब्राहिम यांनी केलेल्या त्यागाची आठवण ईद-उल-जोहाच्या दिवशी सर्व मुस्लिम बांधव करतात या दिवशी ईदगाह, मस्जिद मध्ये विशेष नमाज अदा करुन दुआ केली जाते. इस्लाम धर्मात प्रत्येक मुस्लिम बांधवानं कुर्बानी करणे कर्तव्य म्हणजेच फर्ज समजले जाते. कुर्बानीसाठी मुस्लिम बांधव बकर्‍यांनाच जास्त पसंती देत असल्याने दोन हजार रुपयांपासून पासून ते एक लाख रुपये किमतीचे बोकड मार्केटमध्ये विकायला आहेत. कुर्बानीची परंपरा इस्लाम धर्माच्या स्थापनेपासून चालत आली आहे. ही कुर्बानी बोकड, उंट, मेंढी या जनावरांची दिली जाते.

close