नागपूरमध्ये एका व्यापार्‍यावर गोळीबार

July 9, 2015 8:57 AM0 commentsViews:

crime

09 जुलै : नागपूरमध्ये एका व्यापार्‍यावर आज पहाटे साडे पाचच्या सुमारास अज्ञातांनी गोळीबार केला. इस्तकार भतीजा असं या व्यापार्‍याचं नाव आहे.

नागपूराच्या मोमीनपूरा भागात ही घटना घडली. इस्तकार भतीजा नमाज पडून घरी परतत असताना अज्ञातांनी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या.

या हल्ल्यात इस्तकार भतीजा गंभीर जखमी झाले असून त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. परंतु मारेकर्‍यांचा शोध सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close