महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त राज्यभर विविध कार्यक्रम

November 28, 2009 9:28 AM0 commentsViews: 101

28 नोव्हेंबर महात्मा फुले यांच्या 119व्या पुण्यतिथी निमित्तानं राज्यभर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील महात्मा फुले राष्ट्रीय स्मारकात "महात्मा फुले समता पुरस्कार" प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने देण्यात येणार्‍या सन्मानानं यावेळी ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांना गौरविण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

close