भाईंदर रेल्वे स्टेशनजवळ 4 बेवारस मृतदेह

November 28, 2009 9:33 AM0 commentsViews: 5

28 नोव्हेंबर भाईंदर रेल्वे स्टेशनजवळ प्लॅटफॉर्मवर रात्री 4 व्यक्तींचे मृतदेह सापडले. हे मृतदेह 23 ते 25 वयोगटातल्या व्यक्तींचे आहेत. त्यांची अजूनही ओळख पटलेली नाही. त्यांच्याकडे रेल्वेपास किंवा तिकीटही सापडलेलं नाही. त्यामुळे हा रेल्वे अपघात आहे की घातपात याची चौकशी पोलिस करत आहेत. यांच्यातल्या एकाच्या शरीरावर फेमस कॅटरिंग चे लेबल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

close