‘स्वाभिमानी’चा एकमेव लालदिवाही ‘बंद’, तुपकरांची नियुक्ती रद्द

July 9, 2015 6:34 PM0 commentsViews:

tupkar4309 जुलै : महायुतीचा घटक पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठ्या प्रतिक्षेनंतर मंत्रिमंडळात सहभाग झाला खरा पण आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकमेव लालदिवाही हिरावून घेतला गेलाय.

यंत्रमाग महामंडळाच्या अध्यक्षपदी करण्यात आलेली रविकांत तुपकरांची नियुक्ती हायकोर्टाने रद्द ठरवलीय. या महामंडळाचे यापूर्वीचे अध्यक्ष चंद्रकांत दायमा तुपकरांंच्या नियुक्तीविरोधात हायकोर्टात गेले होते.

कोर्टानेही ही नियुक्ती राजकीय असल्याचं स्पष्ट करताच सरकारी वकिलांनीही तुुपकरांची नियुक्ती रद्द केल्याचं कोर्टात सांगितलंय. पण, या वादातल्या नियुक्तीच्या निमित्ताने भाजपने स्वाभिमानीची फसवणूक केल्याचा आरोप होतोय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close