दिवस पालटले, काँग्रेसचे दिग्गज नेते ‘रस्त्यावर’ !

July 9, 2015 7:30 PM0 commentsViews:

congress ledar232 march09 जुलै : मर्सिडीज मधून फिरणारे नारायण राणे आजचक्क बैलगाडीतून जनतेच्या प्रश्नांसाठी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले. तर दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून ते राधाकृष्ण विखे पाटलांपर्यंतचे दिग्गज नेते आज रस्त्यावर उतरले. काँग्रेस हळूहळू विरोधकांच्या  भूमिकेत येतांना दिसतेय.

काँग्रेसचे हे दोन दिग्गज नेते आज सरकारविरोधात रस्त्यावर उतरले…कालपर्यंत सत्तेत असलेल्या काँग्रेसला आता रस्त्यावर उतरुन संघर्ष करावा लागतोय. काँग्रेसची विरोधात बसण्याची सवयच मोडल्यामुळे…विरोधकांची धार कमी झाली अशी टीकाही सातत्यानं होत होती. पण हळूहळू आता काँग्रेसला आपण विरोधात असल्याची जाणीव होतांना दिसतेय म्हणूनच नारायण चक्क बैलगाडीत बसतांना दिसतायत.

तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात मोर्चा काढला. या मोर्चात हर्षवर्धन पाटील,रमेश बागवे, विश्वजित कदम यांच्यासह हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झालेत. उसाला एफआरपी प्रमाणे दर, शेतकर्‍याला कर्जमाफी या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

तर नगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. बाळासाहेब थोरातांसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते मोर्च्यात सहभागी झाले होतेय.

हळूहळू का होईना काँग्रेसचे मोठे नेते रस्त्यावर उतरु लागलेत…आता आपण सत्तेत नाही याचीही जाणीव काँग्रेस नेत्यांना होतांना दिसतेय. तर दोन पराभवानंतर पुन्हा एकदा नारायण राणे सक्रिय होतांना दिसतायत. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अधिक आक्रमक होतेय की पुढेही ही धार कायम राहणार हे बघावं लागेलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close