श्रीसंतचं अमिताभ बच्चनकडून कौतुक

November 28, 2009 10:21 AM0 commentsViews: 1

28 नोव्हेंबर टीम इंडियाचं शनिवारी मुंबई विमानतळावर आली तेव्हा त्यांच्या स्वागताला साक्षात बिग बी अमिताभ बच्चन होते. अमिताभ त्यांच्या खाजगी कामासाठी विमानतळावर आले होते. त्यांची टीमशी गाठभेट झाल्यावर पुढे येऊन त्यांनी टीमचं स्वागत केलं. कानपूर टेस्टमध्ये 'मॅन ऑफ द मॅच' ठरलेल्या श्रीसंतचं विशेष कौतुक केलं. श्रीसंतने या टेस्टमध्ये 122 रन्स देत 6 विकेट्स घेतल्या होत्या. तर पहिल्या इनिंगमध्येही 5 विकेट्स घेत भारताच्या विजयात मोठी भूमिका बजावली होती. श्रीलंकेविरुद्धची तिसरी टेस्ट येत्या बुधवारपासून मुंबईतल्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर होणार आहे.

close