इस्रोची मोठी व्यावसायिक मोहीम, ब्रिटनचे 5 उपग्रह अंतराळात सोडणार

July 10, 2015 9:31 AM0 commentsViews:

isro-pslv 28

10 जुलै : भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. इस्रो आज पाच ब्रिटीश उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी सज्ज आहे. पीएसएलव्ही-सी-28 या प्रक्षेपकाद्वारे भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 9.58 वा. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून या उपग्रहांचं प्रक्षेपण होणार आहे. या उपग्रहांचं एकूण वजन 1440 किलोग्रॅम आहे.

काल सकाळी 7.28 मिनिटांनी या प्रक्षेपकाचे काउंटडाऊन सुरू करण्यात आले आहे. या प्रक्षेपकाचे कामकाज सुरळीत सुरू असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले. सतिश धवन अवकाश केंमधून याद्वारे पाच ब्रिटीश उपग्रहांचे आज प्रक्षेपण केले जाणार आहे. ही पीएसएलव्हीची तीसावी मोहीम आहे. या मोहिमेत तीन डीएमसी-3 उपग्रह अवकाशात सोडले जाणार आहेत. या व्यतिरिक्त दोन मायक्रो सॅटेलाईटही असतील. हे उपग्रह पृथ्वीवरील प्रतिमा टिपू शकते. ब्रिटनच्या या पाच उपग्रहांचं वजन 1440 किलोग्रॅम आहे. इस्रो पहिल्यांदाच एवढ्या जास्त वजनाचे उपग्रह अवकाशात सोडणार आहे. या मोहीमेच्या यशस्वी लॉन्चिंगनंतर उपग्रहांचं व्यावासायिक प्रक्षेपण करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरेल. या उपग्रहांचे आयुष्य सात वर्षे आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close