माऊली आणि तुकोबांच्या पालख्यांचा आज पुण्यात मुक्काम

July 10, 2015 10:10 AM0 commentsViews:

 

10 जुलै : संत तुकाराममहाराजांच्या प्रस्थानानंतर काल संत ज्ञानेश्वरांच्या पालखीनं काल प्रस्थान ठेवलं. अलंकापुरी आळंदीतून काल रात्री माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालं.

माऊलींची पालखी आळंदीहून पुण्याकडे निघालीय तर तुकाराम महाराजांची पालखी आकुर्डीहून पुण्याकडे निघाली आहे. दोन्ही पालख्या संध्याकाळी 6 वाजता पुण्यात पोहोचतील.

माऊलींच्या पालखीचा मुक्काम पालखी विठोबा मंदिरात असेल तर तुकोबांच्या पालखीचा मुक्काम निवडुंग्या विठोबा मंदिरात असेल. पुण्यात आज आणि उद्या असा दोन दिवसांचा या दोन्ही पालख्यांचा मुक्काम असेल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close