मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखविणार्‍या चंद्रकांत पाटलांचे बोलवते धनी कोण? : शिवसेना

July 10, 2015 11:31 AM0 commentsViews:

uddhav-dsathackarey4533

10 जुलै : राज्यातल्या बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थवरून राज्य सहकारमंत्री चंद्रकात पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. त्यावरून मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखविणार्‍या चंद्रकांत पाटलांचे बोलवते धनी कोण? असा सवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी गृहखात्यासाठी जास्त वेळ दिला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

‘सामना’त सरकारविषयी काही बरेवाईट छापून आले की, या लिखाणामागचा बोलवता धनी कोण ते शोधावे लागेल असा प्रश्न भाजपच्या आशीष शेलार वगैरे मंडळींना पडतो. तोच प्रश्न आता ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पडू शकतो. गृहखात्याचे धनी मुख्यमंत्री फडणवीस आहेत. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी त्यांचीच आहे. मग मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखविणार्‍या चंद्रकांत पाटलांचे बोलवते धनी कोण? या प्रश्नाचे उत्तर आता कोणी द्यायचे, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी गृहखात्यासाठी जास्त वेळ दिला पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी जी चिंता व्यक्त केली त्यात तथ्य असेलही, पण दिल्लीशी हॉटलाईन असलेल्या मंत्र्याने हे सर्व बोलावे याला महत्त्व आहे. बाकी आम्ही काय सांगणार? तुका म्हणे उगी राहावे – जे जे होईल ते ते पाहावे!, असंही ते म्हणाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close