कसाबचे वकील अब्बास काझमी यांची हकालपट्टी

November 30, 2009 9:33 AM0 commentsViews:

30 नोव्हेंबर अझमल कसाबचे वकील अब्बास काझमी यांना 26/11 च्या खटल्यातून हटवण्यात आलं आहे. न्यायधीश एम.एल.ताहिलयानी यांनी काझमी यांची हकालपट्टी केली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची कोर्टातली वर्तणूक नीट नव्हती. दोनच दिवसांपूर्वी कोर्टाने काझमी यांना फटकारलं होतं. त्यानंतर काझमी यांनी कोर्टाची माफी मागावी अशी विनंती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली होती. त्यानंतर काझमी यांनी माफी मागितली होती. मात्र सोमवारी काझमी यांची या खटल्यातून हकालपट्टी करण्यात आली. काझमी यांच्या जागी आता कसाबचे वकील म्हणून के.पी.पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

close