अंधेरीत मेट्रोचा स्लॅब कोसळून पाच जखमी

November 30, 2009 11:58 AM0 commentsViews: 4

30 नोव्हेंबर मुंबईत अंधेरीतल्या चकाला इथे मेट्रो रेल्वेच्या ब्रीजचा स्लॅब कोसळून दुर्घटनेत 5 जण जखमी झाले आहेत. जखमींना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ब्रीजच्या पीलरचा अर्धवट बांधलेला स्लॅब, बाजुलाच पार्क केलेल्या गाडीवरही कोसळला त्यामुळे गाडीचंही मोठं नुकसान झालं. या दुर्घटनेवर एमएमआरडीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मेट्रो रेल्वेचं बांधकाम अनिल धीरुभाई अंबानी यांची रिलायन्स कंपनी करत आहे. रिलायन्सचे अधिकारी या दुर्घटनेची पाहणी करणार आहेत.

close