शिवसेनेच्या नगरसेविका छाया भानजी बेपत्ता

November 30, 2009 12:01 PM0 commentsViews: 1

30 नोव्हेंबर शिवसेनेच्या नगरसेविका छाया भानजी रविवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून बेपत्ता झाल्या आहेत. मुंबई महापौरपदाच्या निवडणूकीपूर्वी हा प्रकार झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या मुलाने वर्सोवा पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे नगरसेविका क्षितिजा पुजारी यांचाही ठावठिकाणा लागत नसल्याने शिवसेनेच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांची पळवापळवी होऊ नये म्हणून त्यांना सांभाळण्याची जबाबदारी संबंधित विभागाच्या प्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. 1 डिसेबर रोजी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक होणार आहे.

close