नेहरू केंद्रात श्यामाप्रसाद मुखर्जींची जयंती बंधनकारक, बाबासाहेबांची जयंती मात्र ऐच्छिक

July 10, 2015 8:21 PM0 commentsViews:

neharu kendra10 जुलै : नेहरू युवा केंद्राच्या सर्व कार्यालयात श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दिनदयाल उपाध्याय यांचे फोटो लावण्याचा वाद ताजा असतांना, आता जयंती साजरी करण्यावरुन नवा वाद उफाळलाय.

श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दिनदयाल उपाध्याय यांची जंयती साजरी करणे बंधनकारक करण्यात आलंय. मात्र, महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ऐच्छिक करण्यात आल्यामुळे वाद सुरू झालाय.

दरवर्षी नेहरू युवा केंद्रात विविध नेत्यांचे जयंतीचे कार्यक्रम साजरे केले जातात. यामध्ये काही ऐच्छिक तर काही कार्यक्रम साजरे करणे बंधनकारक आहे. मात्र, आता श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दिनदयाल उपाध्याय यांची जंयती साजरी करणे बंधनकारक करण्यात आलंय.

तर दुसर्‍या बाजूला बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मात्र ऐच्छिक करण्यात आलीये. नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंह, राजगुरु, सुखदेव शहीद दिवसही याच सदरात टाकण्यात आलीये. यासंदर्भात परिपत्रक काढण्यात आलंय. यापूर्वी आंबेडकर जयंती साजरी करणं बंधनकारक होतं. या निर्णयाचा वेगवेगळ्या पक्षांनी जोरदार विरोध केलाय. संघाचा अजेंडा लागू करण्याचा हा प्रयत्न असल्याची टिकाही सुरू झालीये.

नेहरू युवा केंद्रामध्ये कोणते कार्यक्रम बंधनकारक आहेत ?

आंतराष्ट्रीय योग दिवस
श्यामाप्रसाद मुखर्जी जन्मदिवस
सद्भावना दिवस
गांधी जयंती
पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मदिवस
सरदार वल्लभभाई पटेल
कोणते कार्यक्रम ऐच्छिक आहेत ते पाहूयात
नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
महात्मा गांधी पुण्यतिथी
बाबासाहेब आंबेडकर जयंती
भगत सिंह, राजगुरु, सुखदेव यांचा शहीद दिवस

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close