26/11च्या हल्ल्याशी संबंध नाही : तहाव्वुर राणाचा दावा

November 30, 2009 12:03 PM0 commentsViews: 1

30 नोव्हेंबर 26/11च्या हल्ल्यात आपला हात नाही असं संशयित आरोपी तहाव्वुर हुसेन राणा याने म्हटलं आहे. राणाचे वकील पेट्रीक ब्लेगन यांनी राणाचं याबाबतचं पत्र सादर केलं. राणा सध्या एफबीआयच्या ताब्यात आहे. एफबीआयने शिकागोत डेव्हिड हेडलीसोबत पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा नागरिक तहाव्वुर हुसेन राणाला अटक केली आहे. अटक केल्यानंतर राणाने केलेला हा पहिलाच खुलासा आहे.

close