हॉलिवूड अभिनेते ओमार शरीफ यांचं निधन

July 10, 2015 10:03 PM0 commentsViews:

omar sharif10 जुलै : जगप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते ओमार शरीफ यांचं कैरोमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. हॉलिवूडच्या सार्वकालिक महान अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होते. आपल्या ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ मधल्या शरिफ अलीच्या भुमिकेमुळे त्यांना जगभर प्रसिध्दी मिळाली.

सिनेमांमध्ये मुख्य भूमिका तसंच सहाय्यक कलाकाराची भूमिका तितक्याच सफाईने वठवू शकणार्‍या मोजक्या कलाकारांमध्ये त्यांची गणना होते. मग तो ‘डॉ झिवागो’ मधला कवितेत रमणारा डॉक्टर असो वा ‘फनी गर्ल’मधला जुगारी निक अर्नस्टीन असो त्यांचा अभिनय नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत असे. तिनदा गोल्डन ग्लोबल अवॉर्ड विजेते झालेल्या ओमार शरीफ यांच्यासोबत ‘फायर ऍट माय हार्ट’ या सिनेमात मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेही काम केलं होतं. या दिग्गज अभिनेत्याच्या निधनाने सिनजगतात हळहळ व्यक्त होते आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close