IMEIनंबर नसलेले मोबाईल्स बंद

November 30, 2009 12:24 PM0 commentsViews: 1

30 नोव्हेंबरIMEI नंबर नसलेले अवैध मोबाईल सोमवारी मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार आहेत. IMEI नंबर नसलेल्या मोबाईलमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ट्रायने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जवळपास अडीच कोटी मोबाईल्स बंद करण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये चिनी बनावटीच्या मोबाईल्सचा समावेश आहे. पंधरा अंकी IMI नंबरमुळे फोन कॉलची नोंद ठेवण्यासाठी मदत होते. पण चीनी बनावटीच्या मोबाईलना मात्र हा IMEI नंबर नसल्याने त्यांचा गैरवापर होऊ शकतो. म्हणूनच या फोनच्या वापरावर आता बंदी येणार आहे.

close