गजेंद्र चौहानांचा निवडीचा निर्णय सर्वोत्तम नव्हता,पुकुट्टींचा गौप्यस्फोट

July 11, 2015 3:25 PM0 commentsViews:

pookutty11 जुलै : पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया अर्थात FTIIच्या अध्यक्षपदाचा वाद आता चांगलाच चिघळलाय.  ऑस्करविजेता  रेसुल पुकुट्टी यांनी ट्विटरवर एक मोठा गौप्यस्फोट केलाय.

गजेंद्र चौहान यांना अध्यक्षपदी नेमण्याचा निर्णय हा सर्वोत्तम नव्हता, पण आता तो निर्णय आम्ही मागेही घेऊ शकत नाही, अशी कबुली माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी दिली असं पुकुट्टी यांनी म्हटलंय.

पुकुट्टी आणि एफटीआयआयच्या इतर माजी विद्यार्थ्यांची जेटलींबरोबर 3 जुलै रोजी नवी दिल्लीत बैठक झाली होती. त्या बैठकीत जेटली असं म्हणाले होते असा दावा पुकुट्टी यांनी केलाय. गजेंद्र चौहान यांनी अनेक बी ग्रेड सिनेमांमध्ये काम केलंय. ‘महाभारत’ या मालिकेत त्यांनी युधिष्ठिराची भूमिका केली होती. चौहान यांच्या नियुक्तीविरोधात विद्यार्थी अनेक दिवस आंदोलन करतायत..

रेजूल यांनी काय ट्विट केलं ?

“बैठकीदरम्यान अरुण जेटली आम्हाला म्हणाले की हा सर्वोत्तम निर्णय नाही, पण आता सरकार म्हणून आम्ही हा निर्णय मागेही घेऊ शकत नाही! “

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close