रिव्ह्यु : फक्त बाहुबलीच !

July 11, 2015 5:02 PM0 commentsViews:

अमोल परचुरे, समीक्षक

‘बाहुबली’ हा एसएस राजामौली या दिग्दर्शकाचा सिनेमा आहे…भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला सर्वाधिक बजेट असलेला सिनेमा… या सिनेमाचं बजेट आहे तब्बल 265 कोटी रुपये, म्हणजे मराठी इंडस्ट्रीत एका वर्षात जेवढे सिनेमे बनतात त्या सगळ्यांचं मिळून जेवढं बजेट आहे ना, ते या एकट्या सिनेमाचं आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा किती भव्य सिनेमा आहे ते…बजेटची भव्यता आणि दोन वर्षांची मेहनत सिनेमा बघताना ठळकपणे लक्षात येते. एसएस राजामौली यांनी यापूर्वी ‘मगधीरा’ आणि ‘ईगा’ सारखे भव्य सिनेमे बनवलेले आहेत आणि त्यातल्या स्पेशल इफेक्ट्ससाठी नॅशनल ऍवॉर्ड सुद्धा मिळालेलं आहे. ‘बाहुबली’मध्ये सुद्धा हायक्लास, अतिभव्य मनोरंजनाची सोय राजामौली यांनी केलेली आहे. हॉलिवूडच्या ‘300’ आणि ‘गेम ऑफ थ्रोन’ची आठवण करुन देणार्‍या या बाहुबलीमध्ये बाहुबली नेमका कोण आहे हे खूप चतुरपणे सांगितलेलं आहे. सिनेमाची सुरुवात झाल्यानंतर पहिल्या वीस मिनिटांत एकदा का सेटअप लक्षात आला की मग दिग्दर्शकानं विचार करायला फारसा वेळ दिलेला नाहीये.

काय आहे स्टोरी ?

bahubali7भल्लाला देवाची एक अतिभव्य अशी मूर्ती महिशमती शहरामध्ये उभी करण्याचा प्रयत्न होतोय, शेकडो गुलामांनी हजारो टन वजनाची ही मूर्ती उभारण्यासाठी दोरखंड धरुन ओढतायत…त्याचवेळेस एक अशक्त म्हातारा गुलाम अतिश्रमामुळे कोसळतो, त्याच्यापाठोपाठ इतर गुलामही चक्कर येऊन पडायला लागतात, देवाची मूर्ती हळूहळू जमिनीच्या दिशेने उलट व्हायला लागते, जर ही मूर्ती जमिनीवर कोसळली तर सगळ्या गुलामांचं मरण अटळ आहे. तेवढ्यात एक पिळदार शरीरयष्टीचा दणकट माणूस येतो आणि त्या मूर्तीला एकट्याच्या ताकदीवर तोलून धरतो आणि मग सगळे गुलाम या बलदंड माणसाचा जयघोष करायला लागतात… ही तर एक झलक झाली, अशाच अनेक नाट्यपूर्ण घटनांनी भारुन राहिलेला असा हा बाहुबली आहे.

नवीन काय आणि परफॉर्मन्स

bahubali prabhuबाहुबलीमध्ये त्रुटी जरुर आहेत, पण या त्रुटींकडे दुर्लक्ष करायला लावतात ते व्हीएफएक्स (VFX) इफेक्ट्स… राजामौली यांच्या व्हीएफएक्स टीमने उभं केलेलं महेशमती नगर, निसर्गाचे स्पेशल आविष्कार, हे सगळं मन मोहून टाकणारं आणि त्याचवेळी अचंबित करणारं आहे. या इफेक्ट्समध्ये थोडीजरी गफलत झाली असती किंवा त्यांच्या दर्जामध्ये फरक पडला असता तर सिेनमावर त्याचा नक्कीच परिणाम झाला असता…म्हणूनच स्पेशल इफेक्ट्सवर मेहनत करताना ते सिनेमाच्या सौदर्यांत भर टाकतील, सिनेमाचा प्रभाव वाढवतील अशा अर्थाने त्यांची रचना करण्यात आली. या सगळ्या ट्रीटमेंटला कलाकारांनीही पूर्ण न्याय दिलेला आहे. प्रभास आणि राणा डुगुबात्ती या कलाकारांनी अक्षरश: जीव ओतून काम केलंय.

रेटिंग 100 पैकी 75
 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close