मुख्यमंत्र्यांचा सहकुटुंब फोटो ट्विट करणारा पोलिसांच्या ताब्यात

July 11, 2015 5:25 PM1 commentViews:

cm usa fake photo11 जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परदेश दौर्‍याबाबत फोटो ट्विट करणार्‍या अजय हातेकर या व्यक्तीला ओशिवरा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अजय हातेकरची केवळ चौकशी करण्यात आल्याचं स्पष्टीकरण मुंबई आणि नागपूर पोलिसांनी दिलंय.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नसतान म्हणजेच 2011 -2012 साली कुटुंबासह गोव्याला फिरायला गेले असतानाचा फोटो ट्विटरवर टाकून राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहे आणि मुख्यमंत्र्यांची परीवारासोबत परदेशी वारी असा चुकीचा मथळा टाकल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

या ट्विटमुळं सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात नाचक्की झाल्याची तक्रार अंधेरीचे संजय पांडे यांनी केली होती. या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुभाष खानविलकर यांनी दिली.

हा फोटो 2 जुलै 2015 रोजी सकाळी 8.30 वा ट्विट केल्याची माहितीही सुभाष खानविलकर यांनी दिली. काही दिवसांपुर्वी या प्रकरणी नागपुरमध्येही गुन्हा दाखल करण्यात आलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Punit

    पोलिसांना खूनी बलात्कारी लोक पकडायाला वेल नाही. पण एक फालतू फोटो ट्वीट करणार्‍याच्या मागे हात धुवून लागले. असाच खोट्या न्यूज़ पसरवणार्या सगळ्यांनाच पोलिसांनी पकडायाचे ठरवले तर कॉंग्रेस भाजपा चे निम्मे कार्यकर्ते तुरुंगात जातील.

close