पुण्यात रिक्षा चालकांना युनिफॉर्म सक्ती

November 30, 2009 12:36 PM0 commentsViews: 4

30 नोव्हेंबर पुणे शहरातील रिक्षाचालकांसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने 1 डिसेंबर पासून खाकी युनिफॉर्म आणि बॅचची सक्ती केली आहे. या सक्तीला रिक्षा पंचायतीने विरोध केला आहे. मोटार वाहन कायद्यानुसारच ही सक्ती केल्याचं आयुक्तांचं म्हणणं आहे. पुण्यातले रिक्षा चालक खाकी ड्रेस न घालता रिक्षा चालवितात. तसंच रिक्षा चालविण्यासाठीचा आवश्यक असलेला परवाना म्हणजे बॅचही रिक्षाचालक लावताना दिसत नाही. अनधिकृत रिक्षा चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे आरटीओने रिक्षाचालकांसाठी 1 डिसेंबरपासून ड्रेस आणि बॅचची सक्ती केली आहे. सध्या पुण्यात 55 हजार अधिकृत परवाना धारक रिक्षा आहेत. तर 25 हजारांपर्यंत अनधिकृत रिक्षा प्रवाशी वाहतुक करतात. अनेक रिक्षाचालक इतर चालकांना रिक्षा भाड्याने देतात. अशा रिक्षाचालकांवर कारवाई करण्यासाठी हे पाऊल प्राधिकरणानं उचललं आहे.

close