गेणोबा रेड्याची दिंडी

July 11, 2015 6:59 PM0 commentsViews:

संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवले त्या रेड्याच्या नावाने जाणार्‍या दिंडीनं काल संध्याकाळी जुन्नरमधल्या संतवाडीमधून प्रस्थान ठेवलं. सध्या या दिंडीचा मुक्काम ओळ गावात आहे.. आज दिंडी पंढरपूरच्या दिशेनं पुन्हा प्रस्थान ठेवेल. यंदा या दिंडीचं 9वं वर्ष आहे. जुन्नर तालुक्यातील संतवाडी या ठिकाणी या रेड्याला ज्ञानेश्वरांनासमाधी दिली होती… अनेक सत्वपरीक्षांना तोंड देऊन महाराज आपल्या भावाबरोबर जेव्हा आळंदीकडे निघाले, तेव्हा वाकोबा कोळी आपल्या गेणोबा नावाच्या रेड्याला सोबर घेऊन निघाले, अशी अख्यायिका आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close